ने मजसी ने परत पुण्यभुमीला
सागरा प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूता
मी नित्य पाहिला होता
मज वदलासी मास्टर्स करायला चल जाऊ
उच्च शिक्षण काय असतं ते पाहू
अभ्यासाच्या भितीनी मन विरहशन्कितही झाले
परि GRE score ने सावरले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन
१.५ वर्षात परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी
उच्च शिक्षण अनुभवयोगे बनुनी मी
सगळ्याच मित्रांच्या संगतीने मी
येईन त्वरे, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी
ही फसगत झाली तैशी
पुणेविरह कसा सतत साहु या पुढती
philly DC तमोमय होती
नोकरी मी शोधली या भावे
की परत जायला मिळावे
जरि डॉलर चा अकाउंट मधे हो साचा
हा व्यर्थ भार विसाचा
ती मालकंस सोसायटी , रे
ती प्राज मधली नोकरी , रे
ती रविवारची हनुमान टेकडी , रे
तो टिव्ही रिमोट मला , हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला
इकडे फ़ूड चेन्स बहुत, एक परि प्यारा
मज पुण्याचा "राजवाडा"
पिझा बर्गर इथे भव्य, परी मज भारी
बेडेकर मिसळ मज प्यारी
तीज वीण नको, पास्ता मज ओलिव गार्डन चा
झणझणीत रस्सा तिच्या जरि वरचा
भुलविणे व्यर्थ हे आता, रे
गणेश भेळ गमते चित्ता, रे
सातार-याची काजुकरी , रे
ह्या अन्नदात्यांची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला
या फेनमिषें हससि निर्दया कैसा
कर्ज साठवुनी बसलो ऐसा ?
एक महिन्याची सुट्टी मला ही मिळते
२७ डिसेम्बर, २७ नोवेम्बर ते
चन्गळ करून घेइन जी राहून गेली गेले २ वर्षी
मज जायचय माझ्या मायदेशी
तरि सध्याच्या इकोनोमीस भयभीता, रे
नोकरी न माझी ही जाता , रे
वीसा स्टँम्पिंग करून परत येऊ दे, रे
कर्ज फेडून परत पुण्याला जायला
सागरा, प्राण तळमळला
-------------------------------------
स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर ह्यांची माफ़ी मागून
त्यांच्या बद्दल मनात संपूर्ण आदर बाळगून...
- कौस्तुभ सोमण