बुधवार, १० ऑगस्ट, २०११

गंमत जंमत.. in England !!

सचिन ची शंभरावी सेंच्युरी ..


सेंच्युरी ये ना ... सेंच्युरी ये ना ....

प्रिये , जिंकू कसे तुझ्याविना आपण राणी ग ..

दोन-शून्य, इंग्लंड मध्ये आणीबाणी ग ..

तू ये ना प्रिये ...

मी तर फॅन दिवाणा रसिला ..

मार शतक जरासा नशीला ..


गड्या, उगाच संशयात ते बुडाले रे ...

दोन मॅच वर टीका करून गेले रे ...

तू शतक मार ना ..

विसर झाले गेले गड्या रे ..

जरी लॉर्डस वर शतक नाही मिळाले ..


मंद थंड ही इंग्लंड ची हवा ...

सांभाळ फक्त चेंडू जेंव्हा नवा ...

द्रविड, लक्ष्मण साथीला हवा ..

निवांत घे पहिल्या ३०-४० धावा ..

मग तुझी बहरेल अशी फलंदाजी ..

निष्प्रभ ठरेल गोऱ्यांची गोलंदाजी ..

तू ये ना तू ये ना

ना ना ना ...


ये अशी झोकात ह्या श्रावणी ..

दे संघाला विजयश्री मिळवुनी ...

स्वप्न हे अनेकांच्या लोचनी ..

९९ शतकांवर थांबली मोजणी ..

जाऊ नको दूर आता इंग्लंड सोडूनी ..

ह्याच सामन्यात आणि ह्याच मैदानी ...

तू ये ना तू ये ना

तू ये ये ये ..


सेंच्युरी ये ना ...


- कौस्तुभ सोमण (किशोर कुमार च्या आवाजात )