शनिवार, ३० जुलै, २०११

तिहारी गारवा

एका पावसाळी संध्याकाळी एक "गैरव्यवहार" निवांत खिडकीत बसला होता. पावसाचा मूड असल्यानं तो गारवा ऐकत बसला होता. शेजारीच रोजचं वर्तमानपत्र ठेवलेलं होतं. रोजच्या वर्तमानपत्राला तो आपलं प्रगती पुस्तक समजत असे. त्यानं आज आपण कुठे कुठे करामत केली हे पाहायला म्हणून ते वर्तमानपत्र वाचायला घेतलं. त्याची नजर "कलमाडींना स्मृतीभ्रंश" ह्या बातमीवर गेली. तो चिडला, दोस्तीत झालेली ही कुस्ती पाहून तो तडक उठला आणि कलमाडींना भेटायला तिहार तुरुंगात गेला. कानात गारवा आणि डोक्यात कलमाडींचा स्मृतीभ्रंश अश्या काहीश्या विचित्र समीकरणामुळे कलमाडी दिसताच तो त्यांना म्हणाला ...


तुरुंगातून सुटल्यावर दिल्ली ला जा ..

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या मैदानांना भेट दे ..

मैदानाच्या छपराकडे पाहायला विसरू नकोस

कदाचित ते कोसळलेल नसेल

मैदान बांधायचा आणि मैदान दुरुस्तीचा खर्च विचार ..

दुरुस्तीचा खर्च बांधणी पेक्षा जास्त असेल ..

बघ माझी आठवण येते का ..


मग जवळच असलेल्या पुलावरून चालत जा ..

कदाचित तो कोसळेल ..

तिकडून खेळाडूंसाठी असलेल्या हॉटेल मधे जा ..

तिकडे साबण, door-mats, toilet-papers च्या खरेदीची चौकशी कर ..

खेळाडूंच्या राहायच्या खोल्यामध्ये असलेली अस्वच्छता बघ ...

एखादा डेंगूचा डास कदाचित तुला चावेल ..

बघ माझी आठवण येते का ..


तरीही काही नाही आठवलं तर मग पुण्याला जा ..

एखाद्या ठिकाणी PMT नी जायचा प्रयत्न कर ..

त्यासाठी तुला रस्त्याच्या मधोमध असलेल्या BRT पर्यंत जावं लागेल ..

फक्त बस साठी असलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा , सायकल्स, स्कूटर्स बघ ..

रस्त्यावर असणारे खड्डे मोज ..

गर्दी मधे अडकून एकच सिग्नल तुला तीन वेळा लागेल ..

१५ मिनिटाच्या अंतरासाठी तासभर अडकून पडावं लागेल ..

तू वैतागाशील , त्रासून विचारशील, कोण आहे गेले अनेक वर्ष पुण्याचा MP ?

लोकं तुला उत्तर देतील ..

बघ माझी आठवण येते का ..


- कौस्तुभ सोमण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: