सकाळी उठलो .. चहा केला ... फ्रीज उघडला ...लक्षात आलं की दुधाची आख्खी बाटली नासली होती .. डोळ्यातून पाणी आलं ...माझं दुख्ख फ्रीज मधे मावेनासं झालं ..
मी त्या बाटलीला म्हणालो ..
नासतेस घरी तू जेंव्हा ,
चहा फाटका फाटका होतो,
कॉर्न फ्लेक्स चे होती वांदे,
ब्रेकफास्ट कोरडा होतो
दुध फाटून पनीर घडावे,
प्रसंग तसा ओढवतो,
मग कॉफी दिशाहीन होते ,
बोर्नविटा पोरका होतो
तव झाकण ना बसलेल्या
मज स्मरती अनेक वेळा
वर लेमोनेड असावे,
त्याचाच थेंब मग गळतो,
तू सांग सखे मज काय,
चहात घालू तुझ्या शिवाय,
क्रीमर चा वास उदास
अन ब्लॅक टी अडके घशात
ना अजून माझा गोठा..
ना अजून गवळी झालो ..
झक मारत डेअरीत जातो ..
आणि उशीर ऑफिसला होतो ...
नासतेस घरी तू जेंव्हा ... !!!
- कौस्तुभ सोमण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा