रविवार, १५ जानेवारी, २०१२

जेट लॅग-ला ..

तुझ्या पायरीशी दिन-रात येक न्हाई
हितं येतो सूर्य तवा चंद्र तिथ जायी...
तरीच देवा कळं ना ही झोप कशापायी ..
हरवली रातच्याला, दिसा जांभई ..
कचेरीत पीत बसतो चहा कॉफी सोडा, दुध जायफळ रातीला ..
जेट लॅगला ..जेट लॅगला ..
जेट लॅगला .. देवा .. .जेट लॅगला ..

गंडला ग येळ काळ ..झोपलो दुपारला .. तूच जाग दाखीव गा.. जेट लॅगला ..
तिथ जेंव्हा गेलो होतो तवाबी व्हता लागला ह्यो तुझ्याच उंबर्यात.. जेट लॅगला ..

हे .. उघडला व्हता माझा डोला.. बाकी कुनाचा न्हाई ..
उघडल्या खिडक्या तावदानं.. अंधार जीवाला जाळी ..
झोप दे रातच्याला दिवसाला जाग दे ... इनविती पंचप्राण नयनात जान दे ..
हप्ते गेले तीन देवा विकेंड झाले दोन, तरी नाही पिच्छा सोडला ..
जेट लॅगला .. .. !!

- कौस्तुभ सोमण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: